आईच्या खूनप्रकरणी एकास जन्मठेप
मोराळे ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे ( वय - ३२ ) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून आई - कांताबाई शहाजी शिंदे ( वय ५१) यांचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलगा किरण शिंदे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
वडूज : मोराळे ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे ( वय - ३२ ) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून आई - कांताबाई शहाजी शिंदे ( वय ५१) यांचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलगा किरण शिंदे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गुरूवार दि.११ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेदहा ते शुक्रवार दि. १२ डिसेंबर २०१९ रात्रीच्या सुमारास मोराळे ता.- खटाव जि.- सातारा येथे फिर्यादीचे राहते घरात आरोपी याने मयत कांताबाई शहाजी शिंदे(आई) हिस म्हणाला की माझे मागच्या मुलांची लग्न झाली तुम्ही माझे लग्न का करीत नाही असे म्हणून यातील फिर्यादी वडील शहाजी बाबुराव शिंदे यांना घरातून लाथ मारून बाहेर काढले व घरास आतून कडी लावून मयत कांताबाई शहाजी शिंदे हिस शिवीगाळ दमदाटी करून कुऱ्हाडीने डोकीत घाव घालून गंभीर जखमी करून खून केला . तसेच यातील फिर्यादी व साक्षीदार यास तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचाही खून करीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती पोलिस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्ह्यात तत्कालीन पो.उप.नि. एस.सी.गोसावी यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध अति.जिल्हा व सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील अति.जिल्हा व सत्र न्यायालयात या कामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम यांनी काम पाहिले यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा , वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.एस.कोलेसो यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून आरोपी किरण शहाजी शिंदे( वय - ३२) रा. मोराळे ता.खटाव जि.सातारा यास जन्मठेप व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत व पो.नि. घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाँड पो.उप. नि.दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. विजयालक्ष्मी दडस, पो.कॉ. सागर सजगणे, पो. कॉ. अमीर शिकलगार व पो.कॉ. जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.