सत्यम नगर मध्ये वीस हजारांची घरफोडी
सत्यम नगर मध्ये अज्ञात चोरट्याने वीस हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : सत्यम नगर मध्ये अज्ञात चोरट्याने वीस हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 ते 24 दरम्यान हेमंत सोपान गवते रा. सत्यम नगर, सातारा यांच्या बंद घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील वीस हजारांची रोख रक्कम चोरून नेली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.