अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर गुन्हा
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मयूर चंद्रकांत दोरके रा. देहूर, ता. कोरेगाव, जि. सातारा हा सिव्हिल हॉस्पिटल समोरील एका हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या आडोशाला संशयितरित्या स्वतःचा चेहरा लपवून बसलेला आढळून आला. याप्रकरणी त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.