अपघात प्रकरणी एसटी चालका विरोधात गुन्हा
अपघातात कारचे नुकसान केल्याप्रकरणी एसटी चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात कारचे नुकसान केल्याप्रकरणी एसटी चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कूपर कॉलनी येथे झालेल्या अपघात प्रकरणी शिवाजी ईश्वर अहिवळे (वय ४२, रा. जत जि.सांगली) या एसटी चालका विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुर्यकांत नरहरी जाधव (वय ३५, रा. शहापूर जि. धाराशिव) यांनी तक्रार दिली आहे. अपघाताची घटना दि. ३ नोव्हेबर रोजी घडली आहे. इनोव्हा कार व एसटीचा अपघात झाला आहे. कारचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.