अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा
अपघातात एसटी बस व ट्रकचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एसटी बस व ट्रकचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास सातारा-पुणे हायवे वर भरधाव वेगात, निष्काळजीपणे ट्रक चालवून एका ट्रकला धडक देऊन पुन्हा एसटीला धडकून ट्रक आणि एसटीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालक जमालुद्दीन हमीदसाहेब उस्ताद रा. शंकेश्वर, ता. हुकेरी, जि. बेळगाव याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.