एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी, सातारा येथील भैरव प्लाय दुकानासमोर शुभम भैरवनाथ मोहिते रा. शाहूपुरी, सातारा यांना कोयत्याने, लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी अण्णा माने (पूर्ण नाव माहित नाही) रा. दिव्य नगरी सातारा, प्रेम पवार (पूर्ण नाव माहित नाही) रा. शुक्रवार पेठ सातारा, राज पवार (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही), अनिकेत अहिवळे (पूर्ण नाव माहित नाही) रा. होलार गल्ली सातारा, प्रेम अडागळे (पूर्ण नाव माहित नाही) रा. शाहूपुरी सातारा आणि प्रथमेश जांभळे रा. शाहूपुरी सातारा यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान करीत आहेत.