अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
अपघातात नुकसान केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात नुकसान केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास प्रतापगंज पेठ येथे एका महिलेच्या दुचाकीस भरधाव वेगाने धडक देऊन अपघात करून महिलेच्या दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी आशिष परमेश्वर भोवाळ रा. अमरलक्ष्मी, देगाव रोड, सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत.