दुकानाचे नुकसान केल्या प्रकरणी एकावर गुन्हा
दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सातारा : दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनगर, कॅनॉल शेजारी असणाऱ्या पान टपरीचा पत्रा उचकटून नुकसान केल्याप्रकरणी युवराज उर्फ अण्णा (पूर्ण नाव माहित नाही) रा. प्रतापसिंहनगर, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सावंजी करीत आहेत.