दुचाकीची चोरी
दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जीवन भानुदास आवळे रा. खेड, सातारा यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी क्र. एमएच 11 सीएम 8084 अज्ञात चोरट्याने मेडिकल कॉलेज समोरील रस्त्यावरून चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.