हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा शहरासह तालुक्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे.
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे सातारारोड-पळशी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या दिशेने जाऊन 11 वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकाने अन्य दुचाकीला धडक दिली आणि कार सोडून पळून गेला.
भारतीय जनता पार्टीच्या सातार्यातील कार्यकर्ते-पदाधिकार्यांनी आज सातार्यात जल्लोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला.
वाई शहरात शिवसेनेच्या संवाद यात्रेचा जोरदार झंजावात पहायला मिळाला हजारो महिला पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध झाल्या असून शासनाने दिलेल्या अनेक योजनेमुळे महिला आनंदी आहेत.
सातारा पोलिसांनी सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे मारत धडक कारवाई केली आहे.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्या कुरेशी टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले. तौफिक इम्तियाज कुरेशी वय 23, ईलाही हुसेन कुरेशी वय 25, अरबाज इम्तियाज कुरेशी वय28, ईनायत हुसेन कुरेशी वय 27 सर्व राहणार कुरेशी नगर, मंगळवार पेठ, फलटण या चौघांना हद्दपार प्राधिकरणाने तडीपार केले आहे.