भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. जखमी जावली तालुक्यातील असून संशयित आरोपीच्या तपासासाठी भुईज पोलीस पथक रवाना झाले आहे.
सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते.
जिल्हा परिषद चौक ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे बांधकाम विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावर टाकलेल्या बारिक खडीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उसळत असून, वाहन चालविणे अवघड होत आहे.
सातारा पालिकेचे परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम यांच्या पाणी न देण्याच्या आडमुठ्या धोरणाचा गोडोली ग्रामस्थांनी शुक्रवारी निषेध केला. येथील समाज मंदिर परिसरात गोडोली ग्रामस्थांनी निषेध सभा बोलवत घडल्या प्रकाराची नाराजी व्यक्त केली. आम्ही सुद्धा पालिकेचे करदेयक आहोत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा या बँकेतील कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांच्या भरतीसाठी वृत्तपत्रात आणि बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेल्या जाहिरातीस अनुसरून कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत.
बांगलादेश मधील हिंदूंच्या होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सातारा येथे सकल हिंदू समाजांनी निवेदनाद्वारे केली.
अतीत (ता. सातारा) येथील हॉटेल सिमरनजितमधून साहित्य चोरी करणार्या तीन संशयितांना बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून साहित्य व कार असा 8 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोकशाही गणराज्य घडवण्याच्या निर्धाराची आठवण नागरिकांना होण्यासाठी सातारा शहरात आजपासून सलग तीन दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीत संविधानाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला ताकद दिली. मतदारसंघात प्रचंड निधी आल्याने जनतेची कामे मार्गी लावली. सत्तांतर केले त्याचवेळी पुन्हा विधानसभेत येण्यासाठी झटून कामाला लागायचे ठरवले.
कर्मवीर भाऊराव पाटील, सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा (घटक महाविद्यालय) मधील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दि. २६ नोव्हेंबर, २०२४ रोजी भारतीय 'संविधान दिना'चे आयोजन करण्यात आले.