पत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. विंग, ता. कराड येथील विंग हॉटेल भागात नवीन वर्षाच्या मध्यरात्री ही घटना घडली.
सध्या कराड शहरानजीक पुणे – बंगळुरू महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात अपघातांत जवळपास 80 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, ही मोठी गंभीर बाब असल्याचे मत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केले.
पार्ट्या व चैन करण्यासाठी दुचाकी चोरणार्या मलकापूर परिसरातील एका अल्पवयीन संशयित चोरट्यास शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाच्या पोलसांनी ताब्यात घेतले.
स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते, तर कदाचित कॉंग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले; संधी का दिली नाही, हे माहीत नाही.
कराडच्या कृष्णाकाठी ८२ प्रजातींच्या शेकडो पक्ष्यांचा वावर असल्याचे निरीक्षकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. निरीक्षकांनी याबाबतच्या नोंदी घेतल्या आहेत.
कस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली.
लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणुकांचे चित्र असे वेगळे दिसेल. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला. परंतु राज्यातील वातावरण हे एकदरीत प्रक्रियेबाबत संशयाचे आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कराड दक्षिण मधील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी १८ डिसेंबर २०२४ रोजी "कार्यकर्ता संवाद मेळावा" आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील संवाद साधणार आहेत.
इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर होणारे मतदान संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम नव्हे, तर मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान घ्यावे, या मागणीचा ठराव कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले असून तें आचरणात आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन अभिवादन केले.