लेबनॉनमध्ये इस्रायलकडून मोठे हवाई हल्ले केले जात आहेत. या दरम्यान दक्षिण-पूर्व लेबनॉन मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन मीडिया कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनची सरकारी 'नॅशनल न्यूज एजन्सी' ने आज (शुक्रवार) या विषयी माहिती दिली आहे. बेरूत स्थित 'अल-मायादीन टीवी' ने सांगितले की, आज शुक्रवार सकाळी हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
सविस्तर वृत्तविमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10 वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली.
सविस्तर वृत्तमहायुतीचे आमदार असलेले मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोणंद शहराच्या विकासासाठी आणलेल्या 56 लाख रुपये विकास कामासाठी खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला होता. श्रेयवादासाठी शिवसैनिकांना व शासकीय यंत्रणेवर दबाव टाकणार्या आमच्याच महायुतीच्या आमदारा विरोधात आता आम्ही सर्व शिवसैनिक व मित्र पक्ष त्यांना पराभूत करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. यापुढील काळात आमदाराच्या बगलबच्चांनी आमच्या नादी लागू नये.
सविस्तर वृत्तदक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना त्यांच्या "intense poetic prose" या रचनेसाठी 2024 या वर्षातील साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. त्यांच्या लेखनात मानवी जीवनातील असुरक्षितता, ऐतिहासिक वेदना आणि त्याचे परिणाम प्रभावीपणे मांडले जातात.
सविस्तर वृत्तइस्रायलने सतत एअर स्ट्राइक करुन हिज्बुल्लाहच कबंरड मोडलं आहे. हसन नसरल्लाह, हाशिम सफीद्दीन आणि फौद शुक्रसह हिज्बुल्लाहच्या टॉप 11 कमांडर्सचा खात्मा केलाय. इस्रायलच्या कारवाईने हिज्बुल्लाहच्या अन्य दहशतवाद्यांच खच्चीकरण झालय. आता दहशतवाद्यांना हिज्बुल्लाहच्या तीन टॉप कमांडर्सकडून अपेक्षा आहेत.
सविस्तर वृत्तमिल्टन हे आतापर्यंतचे सर्वात विनाशकारी चक्रीवादळ असू शकते, असा दावा यूएस हरिकेन सेंटरने केला आहे. हेलेन चक्रीवादळाच्या दोन आठवड्यांनंतर हे आले आहे. याआधी सलग दोन वादळ चीनलाही धडकले होते. विशेष म्हणजे एकापाठोपाठ आलेल्या दुसऱ्या वादळाची तीव्रता पहिल्यापेक्षा जास्त होती.
सविस्तर वृत्तइस्रायलं सध्या आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी लढाई लढत आहे. इस्रायलने शेजारच्या लेबनानमध्ये घूसन हिज्बुल्लाह विरोधात मोठी कारवाई केली होती. बेरूतमध्ये इस्रायलच्या बॉम्बहल्लादरम्यान आता हिजबुल्लाहने इस्रायलच्या हैफा शहरात पुन्हा एकदा दहशत माजवली आहे.
सविस्तर वृत्तइस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे सध्या जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. आशिया खंडातील देशांना देखील चिंता सतावते आहे. कारण या संघर्षाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच हे युद्ध होऊ नये म्हणून सगळेच देश प्रयत्न करत आहेत.
सविस्तर वृत्तजगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेचे मक्तेदारी राहिली आहे. अमेरिका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात पुढे आहे. परंतु आता बदल होऊ लागले आहे. भारतासारखे विकसनशील देश महासत्ताक असलेल्या अमेरिकेसमोर आव्हान निर्माण करत आहेत. भारत आता ग्लोबल रिसर्च पॉवर हाउस बनला असल्याचा अहवाल ऑस्ट्रेलियन स्ट्रेटजिक पॉलिसी इंस्टीट्यूटने दिला आहे.
सविस्तर वृत्तअमेरिकेत क्वाड समिटचे आयोजन केले जात आहे, ज्याचा एक भाग म्हणून पीएम मोदी देखील तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यामुळे, क्वाड समिटपूर्वी, शुक्रवारी अमेरिकन खासदारांच्या गटाने अमेरिकन काँग्रेसमध्ये क्वाड कॉकस स्थापन करण्याची घोषणा केली.
सविस्तर वृत्त