फेंगल' चक्रीवादळ पुढील २४ तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. यामुळे उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश किनारी भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच या राज्यातील किनारपट्टी भागांत जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असून काही भागांत संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.
सविस्तर वृत्तभारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांता दास यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका सूत्राने मंगळवारी ही माहिती दिली. तपशील न देता, सूत्राने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की त्याला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तपाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यात गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. बंदूकधाऱ्यांनी पॅसेंजर ट्रेनवर गोळीबार केला. यात 39 जणांचा मृत्यू झाला, तर 10 हून अधिक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्तअंतराळवीर सुनिता विल्यम्स गेल्या सहा महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अडकली आहे. जूनमध्ये अवघ्या 10 दिवसांसाठी सुनीता अंतराळात गेली होती. पण अंतराळातील तांत्रिक बिघाडामुळे तिचं पृथ्वीवर येणं लांबलं.
सविस्तर वृत्तदेशातील कोर्टात अनेक केसेस सुनावणी अभावी पेंडीग असल्याने न्याय मिळण्यास विलंब होत आहे. अशात देशातील केरळ राज्यातील कोल्लम येथे देशातील पहिले ऑनलाईन कोर्ट सुरु झालेले आहे. बुधवार २० नोव्हेंबरपासून या ऑनलाईन कोर्टात सुनावणी सुरु होणार आहे.
सविस्तर वृत्तटेक अब्जाधिश एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीची स्टारशिप (Starship) हे तंत्रज्ञान वापरून दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को अंतर केवळ ४० मिनिटांत पार करता येत असल्याचा दावा स्वत: स्पेस एक्स सीईओ एलन मस्क यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने प्रसिद्ध केले आहे.
सविस्तर वृत्तस्वप्नवत भरारी घेण्यासाठी लागते ती इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी अन् धैर्य. हेच बळ उराशी बाळगून अवघ्या 12 वर्षांच्या धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले. आई-वडिल, पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे.
सविस्तर वृत्तइस्त्रायल आणि हमास युद्धाची व्याप्ती वाढत आहेत. या युद्धात इराणने उडी घेतली. काही दिवसांपूर्वी इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. त्याचा सूड इस्त्रायलने शनिवारी पहाटे पूर्ण केला. इस्त्रायलने इराणच्या अनेक सैनिक ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणचे दोन सैनिक मारले गेले. या ऑपरेशनला इस्त्रायनले ‘ऑपरेशन डेज ऑफ रिपेंटेंस’ (पश्चात्तापाचे दिवस) असे नाव दिले.
सविस्तर वृत्तलेबनॉनमध्ये इस्रायलकडून मोठे हवाई हल्ले केले जात आहेत. या दरम्यान दक्षिण-पूर्व लेबनॉन मध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात तीन मीडिया कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉनची सरकारी 'नॅशनल न्यूज एजन्सी' ने आज (शुक्रवार) या विषयी माहिती दिली आहे. बेरूत स्थित 'अल-मायादीन टीवी' ने सांगितले की, आज शुक्रवार सकाळी हल्ल्यात मारल्या गेलेल्या पत्रकारांमध्ये त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
सविस्तर वृत्तविमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे सत्र सुरूच आहे. शनिवारी अजून एकदा अशा प्रकारची धमकी येऊन धडकली. 10 वेगवेगळ्या फ्लाईट्समध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. इंडिगो आणि अकासा एअरलाईन्सच्या प्रत्येकी पाच विमानांसाठी हा धमकीचा कॉल आला होता. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या. यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मुंबईतून इस्तांबूलकडे रवाना होत असलेल्या फ्लाईट 6E 17 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी आली.
सविस्तर वृत्त