पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे. त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. त्यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हे नेतृत्व आहे. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी तुम्ही जाणून आहात.
चांदा ते बांदा पृथ्वीराजबाबांना कोणी चुकीचे बोलत नाही. एवढी पुण्याई व कर्तृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री असताना स्वतःचे घर भरण्यासाठी काही केले नाही. दुसऱ्या बाजूला पैशाचा पाऊस पाडणारे नेतृत्व आहे. मला कराड दक्षिणच्या मातीचा कल स्पष्ट दिसत आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाविकास आघाडी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दिला आहे. श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देवून आपला पाठिंबा जाहीर केला.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे यशवंतराव मोहिते, विलासकाका आणि मी प्रतिनिधीत्व केले. आमच्याकडून जनतेच्या विश्वासाला पात्र राहून विकासकामे झाली.
कमळ हे दलदलीत उगवते. कराडचा भाग सखल असल्याने इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा.
राज्यातील विधानसभा निवडणूक ही दोन व्यक्तींची नसून, ती दोन विचारांची आहे. एका बाजूस शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जोपासणारी महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला संविधान व राज्यघटना मोडून पुन्हा वर्णव्यवस्था आणणारे जातीयवादी भाजप या दोन विचारांची ही लढाई आहे.
माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाआघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला.
राज्याचे ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री (स्व.) यशवंतराव मोहिते यांनी आयुष्यभर पुरोगामी आणि डावा विचार जपला. त्यांचे कार्य आणि विचार जोपासण्याचे काम त्यांची पुढील पिढी करत आहे.
कराडच्या जनतेच्या विश्वासामुळेच मला केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कराडच्या नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतल्या पासून ते अमेरिकेत इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही कराडकरांच्या प्रेमामुळेच मला राजकारणात काम करण्याची संधी मिळाली.