मुंढे (ता. कराड) येथील सरपंच मनिषा संभाजी जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. एका कार्यक्रमात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीच्या दौर्यात त्यांनी व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला.
कराड दक्षिणमधील विरोधकांनी जनतेच्या पैशातून उभ्या केलेल्या संस्था खाजगी करून त्याद्वारे अर्थकारण करत त्याच जनतेची पिळवणूक केली आहे. सहकारी संस्था खाजगी करण्याचा त्यांचा डाव यापुढे कायम राहील. त्यांची ही दृष्टी जनतेने ओळखली आहे.
कराड तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड वाहनातून नेली जात असताना तळबीड पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मोठ्या रकमा वाहनातून नेल्या जात असल्याने पोलीस दल अलर्ट असून जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक पोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.
डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मतदारसंघात कोट्यावधींच्या निधीतून विकासकामे केली आहेत. जनतेनेही एक व्यक्ती म्हणून अतुलबाबांकडे बघून त्यांच्या कामाची पोहोचपावती मतदानातून द्यावी. कराड दक्षिणमध्ये परिवर्तन परिवर्तन करण्याची ही संधी असून या ठिकाणी डॉक्टर भोसले यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात आजपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत.
महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राबविण्यात येत आहेत.
येथील स्वरसंस्कार म्युझिक अकॅडमीतर्फे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवार दि. २१ व रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी मराठी चित्रपट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
तळबीड पोलीस ठाणे हद्दीतील वहागाव ता. कराड येथे झोपडपट्टीत राहणारी व सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक बेपत्ता झालेली अकरा वर्षे सहा महिने वयाची मुलगी शेजारच्या गावातील पोलीस पाटलाच्या सतर्कतेमुळे सुखरूप मिळवण्यात तळबीड पोलिसांना यश आले.
कराड तालुक्यात अज्ञाताने एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्या बाबतची फिर्याद कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.