महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत तो संशयास्पद आणि संभ्रम निर्माण कराणारे आहेत. यासंदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले.
कराडकडे येण्यासाठी लिफ्ट मागून दुचाकीवर बसलेल्या महिलेचा भरधाव वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चाकाखाली सापडून मृत्यू झाला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्ह आहे. माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवारी) सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
२८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा माणसावर फुले टाकायला पाहिजेत. पण त्यांच्यावर असभ्य बोलता, हे चुकीचे आहे. ते राजकारणातील संत आहेत. असा राज्याचा प्रमुख होणारा नेता कराड दक्षिणमधून निवडून जाईल, याची काळजी घ्या. असे प्रतिपादन माजी आ. रामहरी रूपनवर यांनी केले.
छत्रपतींच्या कराड या भूमीत आल्यानंतर माझी छाती अभिमानाने सतत फुगते. असे सांगून राजस्थानचे कॉंग्रेसचे नेते व खा. सचिन पायलट म्हणाले, भाजप व महायुतीच्या सरकारमध्ये पदाची लढाई सुरू आहे. हे पाहून जनतेचा विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल.
कराड येथील मलकापूर - बैलबाजार रोडलगत शुक्रवारी भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
गेली ८ ते १० वर्षे राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी राज्यात विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. भाजपने दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले.