ऊसाचा गळीत हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकर्यांचे कारखान्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. म्हणूनच शेतकर्यांच्या कष्टाची ऊसाची एकरकमी एफआरपी जमा करा. अन्यथा रयत क्रांती संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
लाडकी बहीण योजना ही योजना फसवी होती. आर्थिक टंचाईमुळे ही योजना बंद करण्यात आली आहे आणि सत्ताधारी निवडणूक आयोगाने सांगितले म्हणून ही योजना बंद केल्याचे खोटे सांगत आहेत. ही वस्तुस्थिती जनतेला कळली पाहिजे, अशी कडवट टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारिणीने 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली.
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे.
मलकापूर, तालुका कराड गावच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणार्या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणार्या दहा जणांच्या टोळीच्या सातारा पोलिसांनी केवळ चोवीस तासांत मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामगिरी झाली आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दोन दुचाकीस्वारांमधील भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकाला लोखंडी गजाने मारहाण झाली. येथील भू-विकास बँक चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
अवैधरित्या दारु विक्रीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका वृद्धेवर कारवाई केली आहे.
सातारा शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.