रस्त्याच्या वादाच्या कारणातून आठ जणांनी मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीच्या विनयभंगासह तिला दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्यासोबत लग्न कर. अन्यथा खासगी फोटो, व्हिडीओ व्हायरल करेन,’ अशी धमकी देवून विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तकराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमलकापूर, तालुका कराड गावच्या हद्दीत दि. 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा एकच्या दरम्यान मुंबईतील पार्टीचे तीन कोटी रुपये रोख रक्कम घेऊन जाणार्या वाहनाला रस्त्यात अडवून दरोडा घालणार्या दहा जणांच्या टोळीच्या सातारा पोलिसांनी केवळ चोवीस तासांत मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व कराड शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामगिरी झाली आहे.
सविस्तर वृत्तजुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदोन दुचाकीस्वारांमधील भांडणे सोडवण्यास गेलेल्या एकाला लोखंडी गजाने मारहाण झाली. येथील भू-विकास बँक चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर दि. 18 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारु विक्रीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका वृद्धेवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तलग्नासाठी आणलेली स्थळे मुलगी पसंत करत नाही म्हणून बापाने रागाने झोपेलेल्या मुलगीचा डोक्यात लाकडी दांडके व लोखंडी अँगल मारून खून केला होता. या प्रकरणात शंकर बजरंग शिंदे (वय 78, रा. औंध) या पित्यास जन्मठेप व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. तब्बल साडेबारा वर्षानंतर आरोपीस शिक्षा झाली आहे.
सविस्तर वृत्त