केंद्र व राज्यातील सरकार हे जनहिताच्या विरोधात अनेक निर्णय घेत आहे आणि जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेत असल्याचा थेट आरोप संविधान विश्लेषक व उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे विधिज्ञ एडवोकेट असीम सरोदे यांनी सातारा येथे बोलताना केला.
सविस्तर वृत्तमराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. ना. देवेंद्र फडणवीस हेच गरजू मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातील लिंब नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल 46 हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे. सातार्यामध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले.
सविस्तर वृत्तग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित शिक्षण सुविधा मिळवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत वाई मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकामांसाठी ६ शाळा खोल्यांना ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले.
सविस्तर वृत्तगणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात काल मंगळवारी अनेक गणेश भक्तांनी बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या गणेश मुर्ती मोठ्या उत्साहात आणि मोरयाच्या जयघोषात घरी आणल्या.
सविस्तर वृत्तशाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यवसायिकाच्या घरातून रोकड व सोन्याचा ऐवज लंपास करणार्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून रोकड व सोन्याचा ऐवज असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्तनागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला उपक्रम राज्यात प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तमराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार असून, त्यात साताऱ्यातील मराठा समन्वयक तात्या सावंत यांचाही समावेश असणार आहे.
सविस्तर वृत्तमोबाईल चोरी, गहाळ झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात ‘सातारा पोलिस दल बेस्ट’ ठरले आहे. भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभाग लवकरच गौरव करणार आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्या प्रोफाईल फोटोचा गैरवापर करून बनावट अकाऊंटद्वारे चुकीचे मेसेज पाठविण्याचा प्रकार वडूज पोलिसांनी उघड केला आहे.
सविस्तर वृत्त